माहिती

पिके फळबागांची माहिती:–

  • फळबाग:–
    • कृष्णा नदीकाठावर वसलेल्या गावचा मुख्य उद्योग शेती असलेने त्यामध्ये फळबाग लागवड केली जाते.
    • मुख्यत: केळी व द्राक्षे या फळबागांचा समावेश होतो.
    • उत्पादित फळे ही परदेशी मार्केटिंग केली जातात व शेतकरी मिळवतात.
  • पिके:–
    • गावामध्ये मुख्य व्यवसाय शेती आहे.
    • यामध्ये ऊस, सोयाबिन, गहू, कांदा, हरभरा, तांदूळ, ज्वारी, मका इत्यादी पिके.
    • त्याचबरोबर टोमॅटो, भाजीपाला ही पिकेही उत्पादित केली जातात.

पर्यटन:–

  • संत गाडगेबाबा अभियान अतिशय प्रभाविपणे राबविलेने संपूर्ण गाव हेच भेटीचे ठिकाण बनलेले आहे.
  • त्यामुळे बाहेरच्या भागातील अनेक ठिकाणचे प्रतिष्ठित ग्रामस्थ गावभेट देवून प्रेरणा घेवून जातात व गावचा आदर्श जपण्याचा प्रयत्न करतात.

प्राणीसंपदा:–

  • गावामध्ये शेतीबरोबर दूध व्यवसाय हा जोडधंदा केला जातो. त्यामुळे गावामध्ये पशुपालन मोठया प्रमाणात केले जाते. तसेच गावाजवळच वाळवा येथे दूध संकलन केंद्र असलेने जास्तीत जास्त दूध उत्पादित करुन शेतकरी महिन्याकाठी दूधाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात आर्थिक उलाढाल करत आहेत त्यामुळे सहाजिकच कुटुंबाचे उत्पन्न वाढलेले आहे.

वनसंपदा:–

  • सन 2003–04 पासून.  गावामध्ये वेगवेगळया प्रकारची वृक्षलागवड करण्यात आली.
  • त्यातच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत विशेष बाब म्हणून वृक्षलागवड करणेत आली.
  • त्यामध्ये बदाम, औषधी झाडे, आवळा, चिंच, पिंपळ, बोनवेल, फुलझाडे इ. विविध प्रकारची गावातील सर्व मुख्या रस्त्यांच्या कडेला वृक्षलागवड करुन वनसंपदा वाढविण्यात आली आहे.