जलस्त्रोत

गावालगतच कृष्णा नदी बारमही वाहत असते. या नदीवर संपूर्ण गावची शेती अवलंबून आहे. गावात अंदाजे 50 ते 55 वैयक्तिक शेती पाण्याच्या योजना कार्यन्वित आहेत. त्यामुळे शेतीला मुबलक व पुरेसा पाणीपुरवठा होत असलेने गाव सदन आहे. गावातील नागरिक व जनावरांसाठी कृष्णा नदीच्या पाण्याचा वापर केला जातो. कृष्णा नदी हाच गावचा मुख्य जलस्त्रोत आहे.