व्यक्तीमत्वे

गाव हे वारकरी सांप्रदायाचे असलेने बहुतांशी लोक माळकरी आहेत. शेती व्यवसाय असलेने अगदी साधे परंतु रांगडया व्यक्तिमत्वाचे लोक आहेत. काही व्यक्तिमत्वे ही मजेशीर व खेळकर स्वभावाची असून नेहमी त्या हसतमुख असतात. सर्वांनाच प्रेरणादायी ठरतील अशा स्वभावाचे लोकही गावात आहेत. गावामध्ये तरुण मित्रमंडळ, युवामंच व जायंट्स ग्रुप आहेत या मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबविले जातात. गाव महात्मा गांधी तंटामुक्त गांव आहे. गावात सलग 34 वर्षे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरु आहे.