संस्था

शैक्षणिक:–

  • गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 4.थी पर्यंत आहेत.
  • ग्रामशिक्षण समिती व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून शालेय गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने मुलांच्यात विविध स्पर्धा घेतल्या जातात.
  • तसेच समितीमाफर्त शाळेच्या अडचणी सोडविल्या जातात.
  • पालक–शिक्षक भेट ठेवून शिक्षकांना प्रेरणा दिली जाते.

सहकारी:–

  • सूर्यगांव विकास सहकारी सोसायटी असून त्यामाफर्त शेतक–यांना कर्ज व कमी व्याजदराने वाटप केले जाते. दरवर्षी कर्जाचे वाटप केले जाते.
  • राजीव गांधी दूध उत्पादक संघ. तसेच काळंबादेवी दूध संघ, हुतात्मा दूध डेअरी इ. दूध संकलन करणा–या संस्था आहेत.
  • गावामध्ये एक पतसंस्था आहे.
  • गावामध्ये महिलांचे 16 बचत गट असून विविध गृह उद्योग आहेत.
  • शेतीला पाणीपुरवठा करणा–या अनेक योजनाही आहेत.