ग्रामदैवत

 • गावचे ग्रामदैवत श्री. काळंबादेवी श्री. काळंबा उत्सव वर्षातून एकदा एप्रिलमध्ये सर्व ग्रामस्थ उत्साहाने साजरा करतात, सदरची देवी भाविकांच्या श्रध्दास्थान असून नवसाला पावते अशी दृढ श्रध्दा आहे. श्री. काळंबादेवीचे स्वतंत्र ट्रस्ट असून ट्रस्ट माफर्त मंदिराची देखरेख व सेवा केली जाते तसे ग्रामदैवतेच्या मालकीची इनाम जमिनही आहे. त्यांच्या उत्पन्नातून लोक उपयोगी कामे केली जातात. गरीबांना मदत केली जाते.

 • धार्मिक स्थळ:–
   • श्री. काळंबा देवी ग्रामदैवत सर्वांचे हद्यस्थानी असून आसपासच्या गावातील ग्रामस्थ भाविक म्हणून उपस्थित राहतात.
   • तसेच गाव वारकरी सांप्रदायाचे असलेने गावात विठ्ठल रुक्मिणी मंदीर आहे.
   • श्री. शिव व हनुमान मंदिर आहेत काळंबादेवी पुजा–यामाफर्त रोज पुजा अर्चा केली जाते.
   • गावच्या पश्चिमेस नागठाणे नावाचे गाव 3 किमी. अंतरावर आहे तेथे ‘कृष्णा’ नदी उत्तर वाहिनी म्हणून प्रसिध्द आहे.
 • गाव एकजुटीचे असून सर्व जयंत्या व मान्यवरांच्या पुण्यतिथी, सण, उत्सव उत्साहाने साजरे केले जातात.