गावाचे वैशिष्ट्ये

सूर्यगांव हे कृष्णा नदीचे काठावर वसलेले आहे, सूर्यगांव हे सांप्रदायिक वृत्तीचे असून गेले 32 वर्षे श्रावण महिन्यामध्ये हरीनाम सप्ताहमध्ये किर्तने, प्रवचने केली जातात.

हे गाव गेली दोन वर्षे एक गांव एक गणपती उत्सव साजरा करीत आहे.

या गावामध्ये दारुबंदी झालेली आहे, एक गांव एक स्मशानभूमी, हे गांव तंटामुक्त आहे, या गावातील शेतकरी विक्रमी शेतीचे उत्पादन घेतात, या गावामध्ये दुग्धव्यवसाय शेतीपूरक व्यवसाय म्हणून मोठया प्रमाणात चालतो, या गावास अद्याप एस.टी. वाहतूक नसून 100% लोक वैयक्तिक जोड रस्त्यापर्यंत वाहतूक व्यवस्था करतात.